Sun, Jun 07, 2020 14:37होमपेज › Marathwada › ‘वैद्यनाथ कारखान्याचे कर्मचारी हे माझे कुटुंबीय’ 

पंकजाताई मुंडेंना पाहताच नातेवाईकांना अश्रू अनावर 

Published On: Dec 09 2017 5:47PM | Last Updated: Dec 09 2017 6:24PM

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना वैद्यनाथ साखर कारखान्याची वीट ना वीट रचताना आम्ही पाहिलं आहे, हा कारखाना फक्त कारखाना नसून आमचं  घर आहे. जे झालं त्याच दुःख आहे पण साहेबांच्या जाण्याचं डोंगराएवढ दुःख ज्यांनी झेललं त्या पंकजाताई आमच्या मदतीला वेळीच धावल्या आहेत, त्यांच्या रूपाने घरचा कर्ता माणूस आमच्या पाठिशी असल्याची जाणीव झाली अशा शब्दांत वैद्यनाथच्या दुर्घटनेतील जखमी कर्मचाऱ्याची आई भारती बाई बालाजी मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात काल झालेल्या दुर्घटनेतील जखमींवर सध्या लातूर येथील लहाने हाॅस्पीटल मध्ये उपचार सुरू आहेत. आज दुपारी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे व कारखान्याच्या संचालिका अॅड. यशश्रीताई मुंडे यांनी रूग्णालयात  जाऊन जखमी व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. यावेळी तीनही मुंडे भगिनींना पाहताच जखमींच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. त्यातील काही महिलांनी तर पंकजाताई व प्रितमताई यांच्या गळ्यात पडून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

रूग्णालयात उपचार घेत असलेला कर्मचारी माधव मुंडे यांच्या आई भारती बाई तर फार धीराने बोलल्या. एवढी मोठी घटना आमच्या घरात घडली असती तर आम्ही जे केले असतं ते सर्व ताई तुम्ही व कारखान्याने आमच्यासाठी केलय. जे झालं त्याच दुःख आहे. साहेबांच्या जाण्याचे डोंगरा एवढ दुःख होतं, त्या दुःखात तुम्ही बहिणी उभ्या राहिलात, तेच आम्ही डोळ्यासमोर ठेवून खंबीरपणे उभा राहू अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

जखमींच्या नातेवाईकांना दिला धीर

वैद्यनाथ साखर कारखान्याचे कर्मचारी हे माझे कुटुंबीय आहेत, कुटुंबप्रमुख या नात्याने मला त्यांची संपूर्ण काळजी आहे, तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहीन, चांगल्यात चांगले उपचार देऊन त्यांना मी बरी करेन, ना. पंकजाताई मुंडे यांच्या शब्दांनी जखमींच्या नातेवाईकांना मोठा धीर मिळाला. 
 

वाचा संबंधित बातम्या

परळी : धनंजय मुंडेंना 'वैद्यनाथ'च्‍या प्रवेशद्वारावरच रोखले

वैद्यनाथ दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी सहा लाख रुपये 

‘वैद्यनाथ’ दुर्घटनेतील चौघांचा मृत्यू; सहाजण चिंताजनक