Thu, Oct 17, 2019 13:05



होमपेज › Marathwada › परळी : टोकवाडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या

परळी : टोकवाडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या

Published On: Aug 03 2019 4:06PM | Last Updated: Aug 03 2019 4:03PM




परळी वैजनाथ : प्रतिनिधी

तालुक्यातील टोकवाडी येथे एका (28 वर्षीय) युवकाने आपल्या राहत्या घरी पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (दि.3) सकाळी उघडकीस आली आहे.   

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्‍या अधिक माहितीनुसार, टोकवाडी येथील रहिवासी संदिपान शेषराव मुंडे याने टोकवाडी येथील आपल्या राहत्या घरी पत्र्याच्या कडूला गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार जाधव हे करीत आहेत.