Thu, Jun 04, 2020 12:15होमपेज › Marathwada › धारुर माजी नगराध्यक्षांच्या पतीचा खून 

धारुर माजी नगराध्यक्षांच्या पतीचा खून 

Published On: Aug 12 2019 8:04PM | Last Updated: Aug 12 2019 8:04PM

नामदेव शिनगारेबीड : प्रतिनिधी

धारुर येथील माजी नगराध्यक्षा सविता शिनगारे यांचे पती नामदेव शिनगारे यांचा खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास धारुर शहरापासून २ किमी अंतरावर घडली.

शिनगारे यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. शिनगारे यांच्या सोबत असलेला घोडके नामक इसम गंभीर जखमी झालेला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

जुन्या वादातून हा खून झाल्याचे समजत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.