Sun, May 31, 2020 02:59होमपेज › Marathwada › बीड : तेलाचा टँकर आणि कारची धडक, २ जण जखमी video

बीड : तेलाचा टँकर आणि कारची धडक, २ जण जखमी video

Published On: May 11 2019 3:23PM | Last Updated: May 11 2019 3:23PM
गेवराई : प्रतिनिधी

मुंबई येथून गोडतेल घेऊन बीडकडे येत असलेला टँकर आणि बीडहून तिंतरवणीकडे जात असलेल्या एका कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारने अचानक पेट घेतला. दरम्यान यावेळी तात्काळ गेवराई येथील दोन, बीड येथील एक अशा दोन अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत कार पुर्ण जळून खाक झाली. हा अपघात शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येडशी औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी येथील उड्डाणपूलाजवळ घडला.

या अपघातात दोन जन जखमी झाले असून, कारमध्ये बीड जिल्ह्यातील शिरुर (कासार) तालुक्यातील तिंतरवणी येथील श्रीराम संस्थानचे तुकाराम महाराज रुपनर यांच्यासह अन्य एक जण जखमी झाला. जखमीवर गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी ट्रॅफिक पोलिस दाखल झाले होते. पोलिसांनी टँकर बाजुला करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

मुंबई येथून गोडतेल घेऊन बीडकडे जात असलेला टँकर क्रमांक (एम एच ४६ - ८३४१ ) हा शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बीडहुन शिरूर (का) तालुक्यातील तिंतरवणीकडे जात असलेली कार क्र.( एम एच २३ एव्ही ६६४९)  या दोन वाहनांची समोरासमोर धडक येडशी औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी जवळील सिंगल सर्व्हिस रस्त्यावर झाली. दरम्यान या अपघातात कारचे शाँटसर्किट होऊन कारने अचानक पेट घेतला. 

यावेळी तात्काळ गेवराई येथील नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व बीड येथील एक अग्निशमन दल पाचारण करण्यात आले होते, मात्र या घटनेत कार पुूर्ण जळून खाक झाली. अग्‍निशमन दलाच्या बंबांनी गाडीची आग विझवली. यावेळी आगीचे आणि धुराचे लोट पाहून वाहनधारकांनी रस्‍त्‍यावर मोठी गर्दी केली होती. 

या अपघातात कारमधील शिरुर (का) तालुक्यातील तिंतरवणी येथील श्रीराम संस्थानचे हभप तुकाराम महाराज रूपनर व अन्य एक जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ गेवराई येथील एका रुग्णवाहिकेने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्‍यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान यावेळी काही वेळ या सर्व्हीस रस्त्यावर वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. ट्राँफिक पोलिसांनी दोन्ही वाहने बाजुला करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.