Thu, Oct 17, 2019 05:41होमपेज › Marathwada › खा. अशोक  चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळले

खा. अशोक  चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळले

Published On: Mar 28 2019 1:22AM | Last Updated: Mar 28 2019 1:22AM
नांदेड : प्रतिनिधी 

नांदेड लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार अशोक चव्हाणा यांच्या उमेदवारी अर्जावरील घेण्यात आलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी अरूण डोंगरे यांनी  फेटाळले आहेत. बुधवारी रात्री अकरा वाजता यावर निर्णय देण्यात आला असून या निर्णयाकडे संपूर्ण राज्यासह तमाम काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष लागले होते.

नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या  उमेदवारांच्या अर्जांच्या छाननी बुधवार दि.27 रोजी ठेवण्यात आली होती. खासदार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार रविंद्र थोरात व शेख अफजलोद्दीन अजिमोद्दीन उर्फ शेख (बहुजन महापार्टी) यांनी आक्षेप घेतला होता. या आक्षेपांवर बुधवारी दिवसभर युक्तीवाद चालला होता.

यासंबंधी जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी निकाल राखून ठेवला होता. सुरवातीला चार वाजेची वेळ देण्यात आली, नंतर साडे नऊ कळवण्यात आले, असे करत करत निर्णय देण्यास रात्रीचे अकरा वाजले.

हे होते आक्षेप 
खा.अशोक चव्हाण यांच्या नावावर भारत पेट्रोलियम कंपनीच्या एलपीजी गॅसची एजन्सी आहे. या कंपनीत भारत सरकारचा 51 टक्के हिस्सा असून गॅसजोडणी व सिलिंडर विक्रीतून चव्हाण यांना आर्थिक मिळकत आहे. त्यांनी भारत सरकारच्या अखत्यारीखालील लाभाचे पद धारण केल्याचा मुद्दा मांडून थोरात यांनी आक्षेप नोंदविला.