Tue, Sep 17, 2019 03:54होमपेज › Marathwada › लातूर : मोबाईल चोरीच्या संशयावरून युवकाचा खून 

लातूर : मोबाईल चोरीच्या संशयावरून युवकाचा खून 

Published On: Dec 26 2017 6:40PM | Last Updated: Dec 26 2017 6:40PM

बुकमार्क करा

लातूर : प्रतिनिधी

मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन पोटात सुरा खुपसून नांदेड येथील एका युवकाचा खून करण्यात आला. विजय लक्ष्मण वाघमारे (२२) असे त्याचे मान असून लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात सोमवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विजय हा कव्हा येथील एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून कामास होता. तो, त्याचा भाऊ नागेश व त्यांचे मित्र गोविंद शेंडगे व दत्ता भोसले यांनी काही दिवसांपूर्वी शेतात पार्टी केली होती. यावेळी दत्ता भोसले याचा मोबाईल हरवला होता. तो विजयने चोरल्याचा संशय दत्ता व गोविंद यांना होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे मोबाईलसाठी तगादा लावला होता. आपण तो घेतला नसल्याचे विजय त्यांना सांगत होता. दरम्यान, विजय हा दूध घालण्यासाठी सोमवारी रात्री बसवेश्वर चौकात आला असता त्याला गोविंदने फोन केला व तिथे थांबण्यास सांगितले. त्यानंतर दत्ता व विजय तेथे आले त्यांनी विजयसोबत वाद घातला व गोविंदने त्याच्या पोटात सुरा खुपसला यात विजय ठार झाला.

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex