Sun, May 31, 2020 03:12होमपेज › Marathwada › गोपीनाथ गड येथे मुंडेंना अभिवादन (Photo)

गोपीनाथ गड येथे मुंडेंना अभिवादन (Photo)

Published On: Dec 12 2017 1:32PM | Last Updated: Dec 12 2017 1:47PM

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी 

लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गड येथे स्वर्गीय मुंडे यांना अभिवादन केले. यावेळी प्रज्ञाताई मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, अमित पालवे, यशश्री मुंडे, अगस्त्य खाडे आदी कुटुंबीय उपस्थित होते.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात ८ डिसेंबर रोजी दुर्दैवी घटना घडली. त्यात पाच जणांचा दुदैवी मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर जखमी झाले. या घटनेतील मृतांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राज्याचे मंत्री महादेव जानकर यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष सविता विजय गोल्हार, आमदार भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, संगीता ठोंबरे, मीराबाई संस्थांनच्या राधाताई सानप, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Image may contain: 15 people, people standing and food

Image may contain: 10 people, people standing and food

Image may contain: 18 people, people standing, food and indoor

Image may contain: 28 people

Image may contain: 24 people, crowd

Image may contain: 8 people, people standing