Mon, Jun 01, 2020 19:37
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › दुचाकीस्वार स्विफ्ट गाडीस धडकला; गंभीर जखमी

जिंतूर-औंढा मार्गावर अपघात; दुचाकीस्वार जखमी

Published On: May 11 2019 6:49PM | Last Updated: May 11 2019 6:49PM
जिंतूर : प्रतिनिधी 

जिंतूर ते औंढा मार्गावर मोटारसायकल आणि मारुती सुझुकी यांचा भीषण अपघात झाला. आज (ता.११) शहरापासून ३  किलोमीटर अंतरावरील मौजे पुंगळा शिवारात ही घटना घडली आहे. अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. 

याविषयी मिळालेली सविस्‍तर माहिती अशी की,  आज (ता.११)  दुपारी २ वाजता  मारुती सुजुकी (क्रमांक एम. एच. ४६ ए. व्ही. ८७४७) घेऊन चालक विनय लक्ष्मण देशपांडे (वय ६४,रा. सम्राटनगर,  औरंगाबाद) हे औरंगाबादकडे जात होते. तर सदर चारचाकीच्या पाठीमागे राम चांगदेव राठोड (वय २६ रा. कुऱ्हाडी, ता.  जिंतूर) हे मोटारसायकलवरुन जात होते. यावेळी छत्रपती गुलाबराव मोहिते (वय ४७,  रा. डोगळतळा, ता. जिंतूर) औंढयाकडे स्विफ्टगाडी(एम. एच .१२  पी.झेड.  ४९१२) घेऊन जात होते. यावेळी मोटारसायकस्‍वारने मारुती सुझुकीला जोराची धकड दिली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या स्विफ्ट या चारचाकीवर आदळल्‍याने चालक राम राठोड हा तरुण गंभीर जखमी झाला. राम राठोड यास जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले आहे.