Sun, May 31, 2020 03:47होमपेज › Marathwada › 'आमचा कसला आलाय कामगार दिन , ना पगार ना मानधन'

'आमचा कसला आलाय कामगार दिन , ना पगार ना मानधन'

Published On: May 01 2019 9:50AM | Last Updated: May 01 2019 9:50AM
नांदेड : दिगंबर शिंदे 

भगवान भोलेनाथ, आरेचंद्र राजे आणि तारावती यांची परंपरा असलेला समाज अर्थात मसनजोगी. गावकड्यात सर्वांसाठी त्या त्या भागात जागा उपलब्ध आहे. मात्र मसनजोगी समाजाला गावकड्यात कोठेही स्थान नाही. आजतागायत मसनजोगी जमात अस्पृश्य असल्याची भावना सिडको स्मशानभूमीत काम करणारे बालाजी पवार( गिरी) यांनी  व्यक्त केली . 

मुळचे निळाएकदरा ता. नांदेड येथील मसनजोगी समाजातील कुटुंब प्रमुख गोविंद राजाराम पवार हे उदरनिर्वाहच्या निमित्ताने नांदेड शहरात आले. नवीन वस्ती असलेल्या सिडको भागातील वस्ती मध्ये केवळ एकच स्मशानभूमी आहे. याठिकाणी मसनजोगी नसल्याने त्यांनी तेथे वास्तव  केले. लेकरासाठी, पोटासाठी काही तरी केलेच पाहिजे म्हणून तीन अपत्य यांची सांभाळ करावयाचे असल्याने हातात डमडम वाजवत करीत पैसे मागावे तर अनेकदा भिक्षा प्रतिबंधक कायदा नुसार त्रासही झाला. आजघडीला सिडको स्मशानभूमीत नित्यनेमाने तीन प्रेत येतात. ते जळाल्यानंतर त्या कुटुंब प्रमुख व्यक्तीकडुन ५०, १०० दिले जातात यावर कुटुंब चालते. महापालिका नांदेड यांच्या कडे अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र अद्याप कोणतेही मानधन आम्हाला मिळालेले नाही. याबाबत सांगायचे तर कोणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. दत्ता हा मुलगा त्यांनी शिकविला तो आज सहशिक्षक म्हणून आहे. मारोती आणि बालाजी हे आपल्या वडीला  प्रमाणेच मसनजोगी याच कामात मदत करतात. दक्षिणा, स्वखुशीने दिलेले पैसे देले त्यावर उदरनिर्वाह चालतो. 

बालाजी पवार यांना शासकीय लाभा बाबतीत विचारणा केली मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारची योजनेची माहीती, लाभ आम्हाला मिळालेला नाही. त्यासोबतच कामगार दिन कधी असतो हे सुध्दा आम्हाला माहीती नसल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या वतीने आम्हाला योजनांचा लाभ मिळावा हीच अपेक्षा असल्याचे त्यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले. 

कामगार नसताना अनेकांना नांदेडात लाभ....

नांदेड जिल्ह्यातील अनेकांना आजघडीला खरेखुरे लाभार्थी आणि कामगार नसताना सुध्दा विविध योजनांचा लाभ मिळतोय. मात्र असंघटित कामगार , कामगार असताना कोणत्याही प्रकारचा लाभ त्यांना मिळालेला नाही. याबाबत सविस्तर माहिती घेवुन संबंधीतांवर कारवाई केली जावी, नियमानुसार कामगार आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शशीकांत गाढे पाटील यांनी केली आहे.