Sun, Jun 07, 2020 09:39होमपेज › Marathwada › मराठवाडा : विडा-देवगाव येथील अपघातात एक ठार; दोन जखमी

विडा-देवगाव येथील अपघातात एक ठार; दोन जखमी

Published On: Apr 23 2019 12:44PM | Last Updated: Apr 23 2019 12:32PM
केज : प्रतिनिधी 

केज तालुक्यातील विडा ते देवगाव येथील मोरे वस्तीवर मोटारसायकल आणि बोलेरो गाडीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एक महिला व लहान मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या तालुक्यातील देवगाव येथील अच्युत दिनकर मुंडे हे जोतिबाच्या दर्शनासाठी जात होते. त्यावेळी बारकाबाई दादाराव मुंडे व पाच वर्षांच्या मुलीस अच्युत मुंडे गावाकडे सोडण्यासाठी सोबत घेऊन येत होते. या तिघांची मोटारसायकल मोरेवस्तीजवळ आली असता सोमवारी (दि,२२) साडेसात वाजण्याच्या सुमारास समोरून येणाऱ्या तुकुचिवाडी येथील बोलेरो गाडी आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातातील अच्युत दिनकर मुंडे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नेकनूर येथे रूगणालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

तर बारकाबाई मुंडे यांना बीड येथे तर मुलीस डोक्याला गंभीर मार लागल्याने औरंगाबाद येथे उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.