Wed, Jun 03, 2020 08:31होमपेज › Marathwada › मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात साडेतीन दशलक्ष घनमीटरने वाढ

मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

Last Updated: Oct 19 2019 10:53AM

मांजरा धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहेअंबाजोगाई : प्रतिनिधी

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या १४ तासांपासून संततधार सुरू आहे. अनेक तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टी झाली असून लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मांजरा धरणामध्ये साडेतीन दशलक्ष घनमीटर पाण्याची वाढ झाली आहे. यामुळे लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मांजरा धरणातील पाणीसाठा गेल्या तीन वर्षांपूर्वी संपूर्णपणे संपल्यामुळे लातूरकरांना रेल्वेने पाणी आणावे लागले होते. गेल्या तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच मांजरा धरणातील पाणीसाठा वाढला असून बांधण्यात आलेल्या बॅरेजस पैकी सात बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अशी माहिती मांजरा धरणाचे अभियंता शाहुराज पाटील यांनी दिली.

गेल्या सहा वर्षांपासून बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने दुष्काळ आहे. शेतकरी आणि नागरिक या दुष्काळात सामोरे जात आहेत. शेतीच्या उत्पन्नाबरोबरच पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. पावसाळा संपला तरीही अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने टँकर सुरू आहेत. परंतु परतीच्या पावसाने बीड जिल्हावासीयांना मोठा दिलासा दिला आहे. शुक्रवारी सायंकाळी मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. या पावसाचा फायदा मांजरा धरणातील पाणीसाठा वाढण्यासाठी झाला. 

केज व अंबाजोगाई तालुक्यातील मंडळामध्ये शुक्रवारी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये 
केज  48, विडा 50,  युसूफ वडगाव 50, होळ 46, ह.पिंपरी 65, होळ  46,  बनसारोळा 63 

अंबाजोगाई तालुक्यामधील लोखंडी सावरगाव 56 मिलिमीटर, पाटोदा ममदापुर येथे अतिवृष्टी झाली असून  85 मिलिमीटर पाऊस पडला आहे.