Sat, Jun 06, 2020 17:05होमपेज › Marathwada › बीड शहरात जळालेल्या अवस्थेत प्रेत आढळले

बीड शहरात जळालेल्या अवस्थेत प्रेत आढळले

Published On: May 14 2018 11:56PM | Last Updated: May 14 2018 11:56PMबीडः प्रतिनिधी

शहरातील शनी मंदीर भागातील एका घरामध्ये ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास आढळून आला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे. सदरील मयत व्यक्तीने जाळून घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

दत्ता राऊत असे त्या मयत व्यक्तीचे नाव असून व्यवसायाने ते धोबी होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरातून धूर निघत असल्याचे काही तरुणांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी घरात जाऊन पहाणी केली असता राऊत यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती पेठबीड पोलिसांना दिली. 

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पहाणी केली. तसेच अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत हे व्यसनाधीन होते. नेहमी ते नशेत असायचे. या संदर्भात बोलताना पेठबीड ठाण्याचे पोलिस निरिक्षक पी.ए. बडे म्हणाले की, घटनास्थळाची कर्मचार्‍यांनी पहाणी केली आहे. सदरील मयत व्यक्तीने जाळून घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तपासात पुढीलबाबी स्पष्ट होतील असेही ते म्हणाले. दरम्यान, दत्ता राऊत व त्यांची पत्नी हे दोघेच घरात रहात होते. त्यांची दोन्ही मुले त्यांच्यापासून वेगळे रहात असल्याचे समजते.