Mon, Jul 13, 2020 11:52होमपेज › Marathwada › सत्तापरिवर्तन गोपीनाथ मुंडेंमुळेच : मुख्यमंत्री

सत्तापरिवर्तन गोपीनाथ मुंडेंमुळेच : मुख्यमंत्री

Published On: Jun 03 2018 1:44PM | Last Updated: Jun 03 2018 2:10PMबीड : पुढारी ऑनलाईन 

आज महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा चौथा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने आज गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कर्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील सर्वच पक्षातील मोठे नेते उपस्थीत होते. 

गोपीनाथ गडावरील कार्यक्रमावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. या स्वागतावेळी पकंजा मुंडेंनी सुरेश धस यांचा उल्लेख ‘भावी आमदार असा केला. या उल्लेखाने धस यंच्या चेहऱ्यावर हसू उमटले. प्रेक्षकांनी देखील याला भरभरून दाद दिली. या कायर्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सत्तेशी संघर्ष कसा करायचा याचे मार्गदर्शन मला गोपीनाथ मुंडेनी केले. गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे देशात सत्तापरिवर्तन झाले. त्यामुळे सत्तापरिवर्तनाचे खरे शिल्पकार गोपीनाथ मुंडे   आहेत.’ असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, या कार्यक्रमासाठी संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे हे दोघेही एकाच व्यासपीठावर आल्याने त्याची चर्चा होती. यावेळी उदयनराजेंनी या बहिणीसाठी दोन्ही भाऊ दोन्ही छत्रपती एकत्र येतील असे म्हणाले. संभाजीराजे म्हणाले, या कार्यक्रमाला मी जाणीवपूर्वक आलो आहे. मला गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यक्रमाला येण्यास  निमंत्रण लागत नाही. हे आमच्या हक्काच ठिकाण आहे.   

या कर्यक्रमासाठी गोपीनाथ गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे भोसले, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, यांच्यासह अनेक आमदार आणि खासदार उपस्थित होते.

 

Tags : gopinath munde 4th death anniversary, program on gopinath gadh, statement of MP udayanraje