Mon, Sep 16, 2019 05:29होमपेज › Marathwada › वसीम मनसबदार यांनी राखला पात्रूडचा गड  

वसीम मनसबदार यांनी राखला पात्रूडचा गड  

Published On: Mar 08 2018 2:06AM | Last Updated: Mar 08 2018 1:54AMमाजलगाव : सुभाष नाकलगावकर

माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव व सर्वात जास्त मुस्लिम मतदार असलेल्या पात्रूड येथील ग्रामंचायतीच्या राजकारणात माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचे कट्टर समर्थक पंचायत समिती सदस्य डॉ. वसीम मनसबदार व सुरेश धुमाळ यांनी ग्रामंचायतीच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात काम केले. यात प्रकाश सोळंके यांची चित भी मेरी पट भी मेरी झालेली आहे.

माजलगाव शहराजवळ आसलेल्या पात्रूड या मुस्लिम बहूल गावाच्या मतदारांच्या कौलावर अनेक निवडणुकीचे निकाल फिरले आहेत. ग्रामंचायतीतीच्या राजकारणात मात्र वेगळचे चित्र नागरिकांना पहायला मिळाले. सुरुवातीला काही स्थानिक नेत्यांत पदावरून ताणाताणी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पर्यंत गेले हा वाद गेला होता. पंचायत समिती सदस्य डॉ. वसीम मनसबदार यांनी राजकीय खेळी खेळली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी भाऊ  कजीम मनसबदार यांना निवडून आले. दलित,मुस्लिमांच्या मतांची मोट बांधण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले.  प्रकाश सोळंके यांचे कट्टर समर्थक सुरेश धुमाळ  हे घनश्याम भुतडा यांच्या पाठिशी राहिले, मात्र यात त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीतून भविष्यातील विधानसभा निवडणुकीत कोण कोण आपल्या पाठीशी राहू शकतो याचा अंदाज प्रकाश सोळंके यांना आला. डॉ. वसीम मनसबदार हे प्रकाश सोळंके यांचेच कट्टर समर्थक असल्याने तेही आपली ताकत विधानसभेला सोळंके यांच्या पाठीशी लावतील.

या  ग्रामंचायतीत प्रकाश सोळंके यांची चित भी मेरी पट भी मेरी झालेली असल्याने त्यांना आगामील विधानसभा निवडणुकीत निश्‍चित फायदा होणार आहे. डॉ.मनसबदार व सुरेश धुमाळ राजकारणातले सख्खे मित्र ग्रामंचायतीच्या राजकारणा पुरते पक्के वैरी झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांत होत आहे.