Sun, Jun 07, 2020 09:14होमपेज › Marathwada › महिला पोलिसांच्या डोळ्यात आसू

महिला पोलिसांच्या डोळ्यात आसू

Published On: Feb 23 2018 1:41AM | Last Updated: Feb 23 2018 1:39AMबीड : प्रतिनिधी

पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी रजा देत नाहीत, सहकार्य करीत नाहीत अशा तक्रारींचा पाढा महिला पोलिस कर्मचार्‍यांनी गुरुवारी विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्यासमोर वाचला. आयजींनी मात्र त्यांनाच स्वत:च आचरण सांभाळा, जबाबदारीने बोला, हेव्यादाव्यातून आरोप करू नका. असे सुनावताच महिला पोलिस अधिकार्‍यांच्या डोळ्यात पाणी आले. 

गुरुवारी विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह दरबार घेतला. यावेळी महिला पोलिस कर्मचार्‍यांनी आपल्या तक्रारीचा पाढा त्यांच्यासमोर मांडला. काही तक्रारी या वैयक्तिक स्वरुपाच्या व हेव्यादाव्यातून होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सुनावले. स्वत:चे आचरण तपासा, जबाबदारीने बोला, वैयक्तिक आरोप करू नका, असे त्यांनी बजावले. यादरम्यान महिला पोलिस अधिकार्‍यांचा अश्रुंचा बांध फुटला होता. यावेळी पोलिस अधिकार्‍यांनही कर्मचारी सहकार्य करीत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या दरबारात वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची तक्रार कर्मचार्‍यांनी आयजींकडे केल्याने दरबारामध्ये पोलिस अधिकार्‍यांना घाम फुटला होता.