Sat, Jun 06, 2020 22:39होमपेज › Marathwada › जीपच्या धडकेत  एक ठार;  २२ किलोमीटर मृतदेह फरपटत नेला

जीपच्या धडकेत  एक ठार;  २२ किलोमीटर मृतदेह फरपटत नेला

Published On: Feb 23 2019 10:10PM | Last Updated: Feb 23 2019 10:10PM
लातूर : प्रतिनिधी
जीपखाली अडकलेल्या व्यक्तीस तब्बल बावीस किलोमीटर फरफटत नेऊन त्याच्या मरणास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात चालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अश्रुबा सिद्धाराम मोरे(४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून रेणापूर तालुक्यातील पोहरेगावचे ते रहिवासी होते. २१ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा प्रकार उघड झाला.

२१ फेब्रुवारी रोजी रात्री रेणापूर येथील पिंपळ फाट्यावरून लातूर येथील काही युवक वाहनाने येत होते. त्यांच्या वाहनास ओव्हर टेक करीत एक जीप (स्कारपीओ) पुढे गेली. त्यावेळी जीप मागील  खालच्या बाजूस पाय लटकत असल्याचे युवकाना दिसले त्यामुळे त्यांनी त्यांच्या वाहनाचा वेग वाढवून जीप चालकास जीप थांबवण्याचा प्रयत्न केला पण, जीप चालकाने जीपचा वेग वाढवला. शंका आल्याने युवकांनी त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले. दरम्यान,  जीपला अडकलेला मृतदेह लातूर येथील औसा रोडवर असलेल्या एका रुग्णालयासमोर गळून पडला. पाठलाग करीत असलेले युवक तेथे पोहोचले व त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना कळवले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. 

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा रेनापूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून अधिक तपास रेणापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिनेश शिंगणकर हे करीत आहेत.