Fri, May 29, 2020 04:05होमपेज › Marathwada › ‘नाफेड’कडे शेतकर्‍यांची पाठ

‘नाफेड’कडे शेतकर्‍यांची पाठ

Published On: Nov 21 2018 1:06AM | Last Updated: Nov 21 2018 1:06AMजालना : सुहास कुलकर्णी

शासनाच्या हमी भावाच्या तुलनेत मोंढ्यात मिळणारा चांगला भाव, चाळणी व एकरकमी रोख मिळणारे पैसे यामुळे सोयाबीन, उडीद, मूग यांची खरेदी सुरू होऊन तब्बल वीस दिवस उलटूनही जालना, बदनापूर व भोकरदन येथील नाफेडच्या खरेदी केंद्राकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या तिन्ही खरेदी केंद्रांवर एक किलोही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून खरेदी होऊ शकलेला नाही. उडीद 46 क्विंटल व मूग 70 क्विंटल खरेदी करण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी नाफेडच्या खरेदी केेंद्राकडे पाठ फिरवल्याने खरेदी केंद्रे ओस पडले आहेत.

नाफेडच्यावतीने 30 आक्टोंबर रोजी जालना व बदनापुर येथे तर 14 नाव्हेंबर रोजी भोकरदन येथील  मोेंढयात सायोबीन, उडीद व मुगाची खरेदी सुरु करण्यात आली. खरेदी सुरु झाल्यानंतर 17 नोव्हेंबर पर्यंत तीन्ही केंंद्रावर एक किलोही सोयाबीनची खरेदी होउ शकली नाही.सोयाबीनची शासनातर्फे  3 हजार 399 रुपये हमी भावाने खरेदी करण्यात येत आहे.मात्र मोंढयात व्यापारी 3 हजार 300 रुपये प्रतिक्विटलने रोखीने व बिना चाळणी खरेदी करीत असल्याने शेतकर्‍यांना नाफेडला एक महिन्याच्या मुदतीवर सोयाबीन विकणे परवडत नाही. या केंद्रावर शेतकरी येत नसल्यामुळे नाफेडचे कर्मचारीही दिवसभर थांबत नाहीत. यामुळे केंद्रासमोर शुकशुकाट दिसून येत आहे.