Sun, May 31, 2020 02:07होमपेज › Marathwada › जालना : विद्यार्थ्यांचा पुरग्रस्तांना मदतीचा हात 

जालना : विद्यार्थ्यांचा पुरग्रस्तांना मदतीचा हात 

Published On: Aug 21 2019 4:45PM | Last Updated: Aug 21 2019 4:45PM

विद्यार्थ्यांनी दिला पुरग्रस्तांना मदतीचा हात राणी उंचेगाव (जालना) : वार्ताहर

कोल्हापुर,सांगली,सातारा भागात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे विविध स्तरातून मदतीचा ओघ वाढत आहे. यामुळे पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी जालन्यातील राणी उंचेगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेच्यावतीने गावातून मदतफेरी काढण्यात आली. 

यामध्ये विद्यार्थ्यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन मदत जमा केली. यामध्ये पुरग्रस्तांना आर्थिक स्वरूपातील, धान्य, कपडे, किराणा सामान, तसेच लहान मुलांसाठी ड्रेस, औषधे, तसेच जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात आली. यावेळी सरपंच विठ्ठल खैरे, राजेश सदावर्ते, उध्दव माने, जि.प.हायस्कुलचे वाल्मिक मोरे, सुरेश चव्हाण, विष्णु शेळके, राम किसन आहेर, कळकटे सर, लक्ष्मण काटे, लक्ष्मण कामठे, श्रीमती वाणी मॅडम, गवळी मॅड्म व आदी. ग्रामस्थ उपस्थित होते.