Thu, Jun 04, 2020 12:20होमपेज › Marathwada › स्केटिंग खेळाडूंची विक्रमाला गवसणी

स्केटिंग खेळाडूंची विक्रमाला गवसणी

Published On: Nov 21 2018 1:06AM | Last Updated: Nov 21 2018 1:06AMजालना : प्रतिनिधी

कर्नाटकातील बेळगाव येथे झालेल्या द लाजेस्ट रोलर स्केटिंग स्पर्धेत  545 खेळाडूंनी सलग 48 तास स्केटिंग करीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधे नोंद करीत विक्रमाला गवसणी घातली. यात जालना जिल्ह्यातील 7 खेळाडूंचा सहभाग होता, अशी माहिती प्रशिक्षक सय्यद निस्सार यांनी दिली.

कर्नाटकातील बेळगाव येथे  11 ते 13 नोव्हेंबर रोजी शिवगंगा रोलर स्केटींग क्लबवर  द लाजेस्ट रोलर स्केटींग स्पर्धेत देशातील विविध राज्यातुन आलेल्या  545 स्केटींग खेळांडूनी सहभाग नोंदविला होता.  यामध्ये जालना जिल्ह्यातील 7  स्केटींग खेळांडूचा सहभाग होता. या 545 स्केटींग खेळाडूंनी सलग्न 48 तास (दोन दिवस व रात्र) स्केटींग रिंगवर स्केटींग केल्यामुळे  गिनीस वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये यांचे नाव नोंदविण्यात आले. 

कर्नाटक येथे झालेल्या या विक्रमात जालना जिल्ह्यातील स्केटींग खेळांडूचा सहभाग होता. या खेळाडुंना  शिवगंगा रोलर स्केटींगच्या  संचालिका ज्योती चिंडक यांचे मार्गदर्शन लाभले.  गिनीस वर्ल्ड रिकॉर्डमध्ये  नोंद झालेल्या खेळाडुत  नैतीक चेचाणी, विधी बियाणी, ओंकार झिंजूर्डे, रेहान शेख, योग रुणवाल, शशांक वाघ  खेळाडुंसह  प्रशिक्षक सय्यद निसार यांचाही समावेश होता. या सर्व खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.