Sat, Jun 06, 2020 23:54होमपेज › Marathwada › धुळ्‍यातून पाच लाख किंमतीची भांग जप्‍त 

धुळ्‍यातून पाच लाख किंमतीची भांग जप्‍त 

Published On: Sep 25 2018 5:02PM | Last Updated: Sep 25 2018 4:59PMधुळे : प्रतिनिधी

धुळयाच्या देवपूर परिसरातून एका घरातुन सुमारे पाच लाख रूपये किंमतीचा १७५  गोन्यामधील भांगचा साठा जप्त करण्यात आला आहे. या गोन्यांवर धान्य असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस शिपायाने गुप्त माहिती काढून भांग तस्करांना दणका दिला आहे.

धुळे शहरातील देवपू भागात तांत्रीक विद्‍यालयाच्या मागील बाजूस असणार्‍या एकता नगरातील समोरील बाजूस एका घरात मोठ्‍या  प्रमाणावर भांगचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी गौतम सपकाळ व राहुल सानप यांना मिळाली.  ही माहीती त्यांनी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे,  विवेक पानसरे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांना देण्यात आली. त्यानंतर भांग तस्कराला रंगेहात पकडण्यासाठी या घरावर पाळत ठेवण्यात आली. मात्र आज सकाळपर्यंत या खोलीजवळ कुणीही आले नव्हते. अखेर पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व देवपुर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, उपनिरीक्षक अनिल पाटील तसेच पंकज चव्हाण, महेंद्र कापुरे, श्रीकांत पाटील, महेंद्र कापुरे, प्रभाकर बैसाणे, रफीक पठाण  यांच्यासह अन्य पथकाने या घरावर छापा टाकुन कुलुप तोडून पाहिले असता खोलीत भांगच्या गोन्या ठेवल्याचे दिसुन आले.

 संबंधीत घर यशवंत सैंदाणे यांच्या मालकीचे असुन त्यांनी हे  घर दीपक कुरे यांना भाडे तत्वावर दिले आहे. या गोन्याची मोजदात करण्यात आली असुन सुमारे १७५  गोन्यांमधे ४३५० किलो भांग आढळून आली आहे. या साठयाची किंमत ५ लाख रूपये असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. 

 पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे म्‍हणाले, धुळे जिल्हयात मोठया प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचार्‍यांनी  माहिती काढल्यानेच हा साठा जप्त करण्यात यश आले आहे. त्यामुळे या  कर्मचार्‍यांना  प्रत्येकी एक हजार रूपयाचा रिवार्ड देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे. तसेच भांगचा साठा धुळयात पाठविणारा तस्कर देखिल शोधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.