Thu, Jun 04, 2020 23:58होमपेज › Marathwada › शिवशाहीसह लालपरीचे नुकसान, हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा

एकरूखा, भोगाव पाटीवर बसेसवर दगडफेक

Published On: Jul 23 2018 5:32PM | Last Updated: Jul 23 2018 5:31PMहिंगोली :  प्रतिनिधी

वसमत तालुक्यातील एकरूखा व भोगाव पाटीजवळ रविवारी (दि.22) रात्री शिवशाहीसह एका लालपरी  बसवर अज्ञात युवकांनी दगडफेक करून बसचे नुकसान केल्याची घटना घडली. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात अज्ञात युवका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाव्या दिवशीही मराठा आरक्षणाची धग जिल्ह्यात कायम असल्याचे चित्र आहे.

22 जुलै रोजी साडेनऊच्या सुमारास औरंगाबादहून नांदेडकडे जाणारी शिवशाही बस क्रमांक एमएच 04 जेके 2844 या गाडीवर एकरूखा पाटीजवळ तीन ते चार अज्ञात युवकांनी मोटारसायकल रस्त्यावर आडवी लावून बसेसच्य काचेची तोडफोड केली. तसेच पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला.  भोगाव पाटीजवळ परभणीहून वसमतकडे जाणारी बस क्रमांक एमएच 20 बीएल 1910 बसवरही अज्ञात युवकांनी दगडफेक करून बसचे नुकसान केले. 

या अज्ञात  युवकास गाडीतील चालक व वाहकाने पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु अंधाराचा फायदा घेत युवक पसार झाले. बसचालक ए.पी.ठोके यांच्या तक्रारीवरून हट्टा पोलिस ठाण्यात अज्ञात युवकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गुलाब बाचेवाड करीत आहेत.