Mon, Jun 01, 2020 18:44
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › लातूर जिल्ह्याती बळीराजाला दिलासा, दोन मंडळात अतिवृष्टी

लातूर जिल्ह्याती बळीराजाला दिलासा, दोन मंडळात अतिवृष्टी

Published On: Nov 19 2018 10:59PM | Last Updated: Nov 19 2018 10:58PMलातूर : प्रतिनिधी

लातूर जिल्ह्यात रविवारी रात्री सरासरी ११मिमी पाऊस झाला असून,  निलंगा तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या पर्जन्याने रब्बीची पेरणी गती घेणार आहेत. 

रविवारी लातूर जिल्ह्यातील अनेक गावात आणि शहरात पावसाचे मुसळधार पाऊस पडला. निलंगा तालुक्यातील निटूर व निलंगा महसूल मंडळात  अतिवृष्टी झाली. निटूर मंडळात ७८ तर निलंगा मंडळात ६८ मिमी पावसाची नोंद झाली. औसा महसूल मंडळात ३५,  मातोळा ३२, लामजना २७, किनिथोट १० व बेलकुंड मंडळात ८ मिमी पाऊस झाला. रेणापूर तालुक्यात पानगाव मंडळात ३० मी मी तर, उदगीर तालुक्यातील देवर्जन मंडळात २२ मिमी पाऊस झाला. अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ३६ मीमी पाऊस हाडोळती महसूल मंडळात नोंदला गेला. याशिवाय या तालुक्यातील अंदोरी ३०, किनगाव २४ असा पाऊस पडला. चाकूर तालुक्यातील शेलगाव मंडळात ३० मीमी पाऊस झाला. देवणी तालुक्यातील वलांडी मंडळात २५ तर शिरूर आनंतपाळ तालुक्यातील हिसामाबद मंडळात ४४,  शिरूर आनंतपाळ  १२  तर साकोळ मंडळात  ११ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, जळकोट तालुका कोरडा राहिला.

तालुकानिहाय सरासरी पाऊस
 निलंगा २३ ३८, अहमदपूर१९.५०,  औसा १६.८६, रेणापूर १३.५०, शिरूर अनंतपाळ११.५९, देवणी ८.३३, चाकूर ६.६०, उदगीर ३.५७ लातूर १.८८