Sun, Jun 07, 2020 16:15होमपेज › Marathwada › मराठा आरक्षणासाठी तरुणीची आत्‍महत्‍या 

मराठा आरक्षणासाठी तरुणीची आत्‍महत्‍या 

Published On: Aug 02 2018 9:39PM | Last Updated: Aug 02 2018 9:27PMशिराढोण : प्रतिनिधी

देवळाली (ता.कळंब) यथील १९ वर्षीय मुलीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्‍महत्‍या केली. तृष्णा तानाजी माने ( रा. देवळाली) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या मुलीचे नाव आहे. तृष्‍णा हिने मराठा आरक्षण आणि कर्जबाजारी पणातून आलेल्या नैराश्यामुळे २९ जुलै २०१८ रोजी विषारी औषध घेतले होते. नातवाईकांनी तिला उपचारासाठी उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.  उपचारादरम्यान बुधवारी (दि. १ ) रात्री आठ वाजता तृष्णाचा मृत्‍यू झाला.

तृष्णा ही विद्यार्थिनी उस्मानाबाद येथील व्हि. जे. शिंदे महाविद्यालयात बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तिचे वडील शेतकरी आहेत. मराठा समाजातील मुलांना गुणवत्ता असूनही नोकरीची संधी नाही, शासन मराठा समाजाला आरक्षण देत नाही. दुष्काळामुळे सततची नापिकी, वडिलांवर कर्जाचा बोजा असून, घरात आपण दोन बहिणी मराठाआरक्षण नसल्याने बेकार आहेत. कर्जबाजारी असल्याने वडिलांना शैक्षणीक आणि लग्नाचा खर्च पेलावणार नाही. यामुळे तृष्णा हिने आत्महत्या केल्याचे नातवाईकांनी पुढारीशी बोलताना सांगितले.