होमपेज › Marathwada › तलाठ्यावर लाच मागितल्याप्रकरणी कळंबमध्ये गुन्‍हा

तलाठ्यावर लाच मागितल्याप्रकरणी कळंबमध्ये गुन्‍हा

Published On: Nov 14 2017 7:45PM | Last Updated: Nov 14 2017 7:45PM

बुकमार्क करा

कळंब : प्रतिनिधी

विहिरीचा फेर मंडळ अधिकारी यांच्याकडून मंजूर करुन घेऊन सात बारा उतारा देण्यासाठी एक हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी तलाठी गुणवंत कुलकर्णी यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला. कळंब पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार दि. १४ ऑक्टोबर रोजी  चुलत्याच्या नावे असलेल्या विहिरीचा फेर ओढून देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार दि. १४ नोव्हेंबर रोजी इटकूर येथील तलाठी गुणवंत कुलकर्णी यांच्या विरुद्ध कळंब पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बी. जी. आघाव करत आहेत. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक व्ही. बी. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली, विनय बहिर, बी. जी. आघाव, व ला. प्र. विभाग टीमच्या मदतीने पार पाडले.