Tue, Dec 10, 2019 14:25होमपेज › Marathwada › निकालापूर्वीच राष्ट्रवादीला धक्का; जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत प्रवेश करणार 

निकालापूर्वीच राष्ट्रवादीला धक्का; जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत प्रवेश करणार 

Published On: May 22 2019 9:15AM | Last Updated: May 22 2019 9:15AM
मुंबई : दिलीप सपाटे

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर आज (ता.२२) सायंकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. लोकसभा निकालापूर्वी राष्ट्रवादीला हा मोठा हादरा मानला जात आहे. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांनी सुद्धा राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. 

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सुत्रे क्षीरसागर यांच्याकड़े होती. मात्र, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे गेली. त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे देखील त्यांच्यापासून दूर गेले. पक्षातील नेत्यांनीच त्यांना आपल्या विरोधात हवा दिल्याचा राग क्षीरसागर यांना आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरी दिलेली भेट आणि वाढलेली जवळीक पहाता ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. त्यांनी लोकसभा निवडणुकीत ही भाजप उमेदवार प्रितम मुंडे यांना उघड मदत केली होती. मात्र, युतीत ही जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीची गणित मांडत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.