Sun, Jul 05, 2020 12:48होमपेज › Marathwada › नांदेड : वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडूनच वनरक्षकास मारहाण

नांदेड : वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडूनच वनरक्षकास मारहाण

Last Updated: Jun 01 2020 5:38PM
नांदेड : पुढारी वृत्तसंस्था

सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्या ऑटो रिक्षावर वनरक्षकाने कारवाई केली. सदर कारवाई केल्याबद्दल किनवट येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यानेच त्या वनरक्षकास मारहाण करत अश्लील शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. ही घटना २८ मे रोजी घडली असून याबाबतची तक्रार वनरक्षकाने किनवट पोलिस ठाण्यात दिली आहे. मात्र अद्याप पोलिस ठाण्यामार्फत कोणता ही गुन्हा नोंद करुन घेण्यात आलेला नाही. 

अधिक वाचा : परभणीत बाधितांची संख्या पोहोचली ८२ वर

चिखली येथील वनरक्षक सिद्धार्थ मिलिंद वैद्य हे किनवट तालुक्यातील किनवट प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी ३१ मे रोजी किनवट पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या माहिती नुसार, वनरक्षक सिद्धार्थ वैद्य हे चिखली हून किनवट येथील कार्यालयात येत होते. तेव्हा एका ॲटो रिक्शामधून कट केलेले सागवान लाकडाची तस्करी होत असल्याचे वैद्य यांच्या निदर्शनास आले.

वैद्य यांनी त्या ॲटोचा पाठलाग करून ठाकरे चौक, गोकुंदा येथे पकडले. त्यावेळेस वैद्य यांच्या सोबत कार्यालयीन सहकारी गुळवे हे होते. दरम्यान ॲटोला पकडल्यानंतर वैद्य यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना फोन लावला मात्र कोणीही त्यांचा फोन न उचलल्याने कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. तोपर्यंत चालक शेख शमी अनवत व इतर दोघे ॲटो सोडून पळून गेले. त्यानंतर सिद्धार्थ वैद्य यांनी तो ॲटो वनपरिक्षेत्र कार्यालयात आणला आणि त्याचा प्रथम गुन्हा अहवाल लिहिला. या कारवाईचा राग मनात धरून वनपरिक्षेत्र अधिकारी खंदारे यांनी कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांच्या समक्ष वैद्य यांना मारहाण करीत खाली पाडले आणि वैद्य यांना अश्लीश शिवीगाळ ही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अधिक वाचा : नांदेड : आणखी एका डॉक्टरसह तीन पॉझिटिव्ह!

याप्रसंगी वाहनचालक आवळे, वनपाल के.जी. गायकवाड व गुळवे हे हजर होते. याप्रकरणी वनरक्षक सिद्धार्थ वैद्य यांनी किनवट पोलिस ठाण्यात २८ मे रोजी तक्रार नोंदविण्यास गेले असता. पोलिसांनी त्यांचा अर्ज न स्विकारता या प्रकणी त्यांच्याच कार्यालयात दाद मागण्याचा सल्ला दिला. या प्रकरणामुळे प्रचंड मानसिक दडपणात असणारे वनरक्षक सिद्धार्थ वैद्य यांनी पुन्हा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले. यावेळी ही त्यांची तक्रार नोंदविण्यास पोलिसांकडून चालढकल करण्यात आली. परंतु, वैद्य यांनी तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपली व्यथा फोनच्या माध्यमातून सांगितल्यावर त्यांचा अर्ज स्विकारुन याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. पण अद्याप तक्रारीच्या आधावरुन कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

अधिक वाचा : नागपूरातील कोरोना कंट्रोलचा मुंडे पॅटर्न; अर्ली ट्रेसिंग, मास क्वारंटाईन, टीम मॅनेजमेंट