Sun, Jun 07, 2020 08:22होमपेज › Marathwada › जाफराबाद येथे पाच दुकाने जळुन खाक

जाफराबाद येथे पाच दुकाने जळुन खाक

Published On: Oct 15 2018 12:57PM | Last Updated: Oct 15 2018 12:57PMजालना : प्रतिनिधी

जाफराबाद शहरातील मुख्य रस्त्यावर पंचायत समिती जवळील भालके काँप्लेक्स मधिल पाच दुकाने जळुन खाक झाली आहेत. या आगीत सुमारे ४० लक्ष रुपयांपेक्षा अधीक नुकसान झाले आहे. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दोन तळी असलेल्या या ईमारतीत मागुन एका दुकानात शॉर्टसर्कीट होवून आग लागली होती. 

भोकरदन येथील अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत खालच्या मजल्यातील चारही दुकाने जळुन खाक झालेली होती. स्थानिक लोकांच्या मदतीमुळे वरील सात ते आठ दुकाने वाचली. स्थानिकांनी टँकराच्या साहाय्याने अग्निशमन दल येईपर्यंत आगा विझवण्याचा अतोनात प्रयत्न केला. दुपारी १२ वाजता अग्निशमन दलाला स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. जाफराबाद शहरात आज पर्यंतची ही सर्वात मोठी आग आहे.