Sat, Oct 19, 2019 09:47होमपेज › Marathwada › जिल्ह्यात पहिल्यांदाच 24 मंडळांत अतिवृष्टी

जिल्ह्यात पहिल्यांदाच 24 मंडळांत अतिवृष्टी

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:26AMपरभणी : प्रतिनिधी 

दिर्घखंडानंतर 2 दिवसांपासून जिल्ह्यात सुर्यदर्शन न होऊ देता वरुणराजाने धुवॉधार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यात सगळीकडे पाणीच-पाणी झाले. नदी-नाले खळखळून वाहायला लागली. जिल्ह्यातील चार तालुक्यांसह 24 मंडळांमध्ये  अतिवृष्टीचे प्रमाण पार केले. परंतु  नद्यांनी  अद्यापही धोक्याची पातळी ओलांडली नाही. 

25 दिवसांच्या दिर्घखंडामुळे शेतकर्‍यांच्या खरिप पिकास मोठा फटका बसला. परंतु शेवटी श्रावणात पावसाने हजेरी लावली. 15 ते 17 ऑगस्ट  सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यात 72.86 मी.मी.पाऊस झाला. 1 जुन पासून अद्यापर्यंत एकुण सरासरीपेक्षा 49 टक्के पाऊस झाला आहे. मागील तिन दिवसापासून  जिल्ह्यातील एकुण 27  पैकी 24 मंडळांमध्ये 90 मी.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकर्‍यांना येत्या काळात अतिवृष्टीचाही फटका बसतो की काय अशी भिती निर्माण झाली आहे. नद्यांना पूर आलेला असला तरी जिल्ह्यात कुठेही धोक्याची पातळी नद्यांनी ओलांडली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे पावसामुळे सध्यातरी आपत्तीजनक स्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली नाही. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांनी दिली आहे.  परंतु या दोन दिवस संततधार पडलेल्या पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे पहावयास मिळत आहे.  पिकांना जिवदान मिळाले असले तरी पावसाच्या दिर्घखंडामूळे यापूर्वीच पिकाची उपत्पादन क्षमता कमी झाली आहे.  यामुळे  उत्पादनमात्रेत घट होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या तिन दिवसांपासून  सूरू असलेल्या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा दिला असून येत्या काळात चांगला पाऊस होऊन  जलस्त्रोत भरावेत अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्‍त केल्या जात आहे.