Sun, Jun 07, 2020 07:49होमपेज › Marathwada › हिंगोलीत दोन एकर गांजाची शेती करणारा गजाआड 

हिंगोलीत दोन एकर गांजाची शेती करणारा गजाआड 

Published On: Nov 03 2018 4:43PM | Last Updated: Nov 03 2018 4:43PMहिंगोली : वार्ताहर 

औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ येथे कापूस व तुरीमध्ये सुमारे दोन एकर क्षेत्रावर गांजाचे आंतरपीक घेतल्याचा प्रकार   उघडकीस आला आहे. पोलिसांनी ५०२ गांजाची रोपे जप्त करून शेती मालकाविरोधात हट्टा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पूरजळ शिवारातील संजय हरिभाऊ मगर यांच्या शेतामध्ये गांजाचे पीक घेतले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस उपाधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, पोलिस ज्ञानोबा मुलगीर यांच्या पथकाने आज सकाळी पूरजळ शिवारात जाऊन पाहणी केली. यामध्ये संजय हरिभाऊ मगर यांच्या शेतातील कापूस व तुरीच्या पिकांमध्ये सुमारे दोन एकर क्षेत्रावर गांजाचे आंतरपीक घेतल्याचे समोर झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ५०२ झाडे जप्त केली आहेत. 

या प्रकरणी संजय मगर  या शेतकऱ्या विरूध्द हट्ट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.