Sat, Jun 06, 2020 17:03होमपेज › Marathwada › सरकार पतंजलीची भागीदार झाली की काय ?

पतंजलीवरच सरकारचे प्रेम का? धनंजय मुंडेंचा सवाल 

Published On: Jan 22 2018 2:38PM | Last Updated: Jan 22 2018 2:51PMहिंगोली : प्रतिनिधी  

आपले सरकार मार्फत पतंजली ची उत्पादने विकण्यास परवानगी देऊन सरकार पतंजली वर मेहेरनजर दाखवत आहे. एकाच खाजगी कंपनीवर सरकारचे इतके प्रेम का ? आपले सरकार सेवा केंद्राचे दुकानच करायचे असेल स्पर्धात्मक निविदा काढून इतर भारतीय आयुर्वेदिक  कंपन्यांची आणि महिला बचत गटांची उत्पादनेही आपले सरकार मधून विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

वाचा बातमी : राज्य सरकार आता विकणार ‘पतंजली’ उत्पादने

पतंजली या स्वतःच्या मर्जीतील खाजगी कंपनीला ‘आपले सरकार‘ची केंद्र विक्रीसाठी देण्यापेक्षा या राज्यातील हजारो महिला बचत गटांनी उत्पादित केलेली उत्पादने या केंद्रातून विकली तर राज्यातील लाखो गरीब महीलांना रोजगार मिळाला असता. तसेच तीन वर्षांपासून महिला बचत गटांना बाजारपेठ देण्याच्या केवळ घोषणा दिल्या जात असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

पंतजलीला सवलतीत प्लॉट, सवलती आणि विक्रीसाठी दुकानेही दिली जात आहेत सरकार पतंजलीची भागीदार झाली की काय असा खोचक सवालही उपस्थित केला आहे.