Sat, Jun 06, 2020 16:13होमपेज › Marathwada › हिंगोली जिल्ह्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू

Published On: Apr 29 2019 5:27PM | Last Updated: Apr 29 2019 5:21PM
औंढा नागनाथ : प्रतिनिधी

 हिंगोली जिल्ह्यात उन्हाचा पारा ४६  अंशांवर पोहचला आहे. तीव्र उन्हामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढत असतांना रविवारी (दि.२८) तालुक्यातील गोजेगाव येथे ३५ वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी ६  वाजता घडली.

गोजेगाव येथील संतोष कुंडलीक नागरे हा दिवसभर शिवारामध्ये जनावरे चारण्यासाठी गेला होता. सायंकाळी सहाच्या दरम्यान घरी परतल्यानंतर संतोष याने पाणी पिले. त्यानंतर तो लगेच खाली कोसळला. त्याला औंढा नागनाथ येथील ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. डॉ.गजानन वाशिमकर यांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह सोमवारी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उष्माघाताने संतोष याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ.वाशिमकर यांनी दिली.