Fri, Jun 05, 2020 23:18होमपेज › Marathwada › शेतकऱ्यावर अस्मानी संकट

शेतकऱ्यावर अस्मानी संकट

Published On: Jul 24 2019 5:41PM | Last Updated: Jul 24 2019 7:06PM
बोरी (परभणी) : प्रतिनिधी

बोरी व परिसरातील शेतकऱ्यांना अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने दडी मारली आणि गेल्या महिन्याभरापासून अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे ज्या काही शेतकऱ्यांनी बोरी मंडळांमध्ये पेरणी केलेली आहे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. या चिंताग्रस्त शेतकऱ्यावर अस्मानी आणि सुलतानी संकटे ओढवली आहेत. याचबरोबर जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. 3000 हजार रुपयात 100 पेंढ्या विकत घेऊन आपल्या जनावरांसाठी चारा विकत घ्यावा लागत आहे.

मागील तीन-चार वर्षांपासून या पावसाच्या लहरीपणामुळे दरवर्षीच तूर ,मूग, उडीद, कापूस या पिकांना पेरणी केल्यानंतर पावसाची आवश्यकता असते. परंतु या पावसाने दडी मारल्यामुळे पिके माना टाकत आहेत. तर काही ठिकाणी पाऊस नसल्यामुळे पिके वाळून जात आहेत. त्याचबरोबर उन्हाळ्यासारखे वातावरणात गर्मी असल्यामुळे पिके वाळून जात आहेत. त्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

अगोदरच शेतकऱ्याने उधार पाधार करून बी बियाणे खरेदी केले आहेत. त्यातच या दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट पुन्हा एकदा येणार असे दिसून येत आहे. पावसाने दिलेल्या ताणामुळे पुन्हा दुबार पेरणी करावी की काय? या काळजीने शेतकरी ग्रासला गेला आहे. तसेच शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

3000 रुपयात 100 कडब्याच्या पेंढ्या 

जुलै महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. जनावरांना चार यांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. 3000 रुपयात 100 कडब्याच्या पेंढ्या विकत घेऊन जनावरांसाठी चाऱ्याची सोय करावी लागत आहे. तसेच पाऊस पाणी नसल्यामुळे चारा मिळणे ही कठीण झाले आहे.