Mon, Jun 01, 2020 18:59
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › अश्लिल मेसेज पाठवणाऱ्या शिक्षणाधिकारी जगतापवर गुन्हा दाखल!

अश्लिल मेसेज पाठवणाऱ्या शिक्षणाधिकारी जगतापवर गुन्हा दाखल!

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 16 2018 7:34PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

सहकारी महिलेला व्हॉटस्अपवर अश्‍लिल मेसेज पाठविणार्‍या शिक्षणाधिकार्‍याविरोधात आज विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन जगताप असे या अधिकार्‍याचे नाव असून त्याच्या कृत्याबद्दल उस्मानाबादेत संतापाची लाट पसरली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार शिक्षणाधिकारी सचिन जगताप याने काही दिवसांपूर्वी सर्व शिक्षा अभियान विभागात कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्‍यारासोबत अश्‍लिल चॅटींग करीत औरंगाबादला जाऊन मौजमजा करण्यासाठी आग्रह धरला होता. याला स्पष्ट नकार देत या महिलेने अशा चॅटींगला विरोधही केला होता. तरीही त्याचा आग्रह कायम होता. अखेर संतप्‍त महिलेने आनंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तिथेही पोलिसांनी या महिलेला झुलवत ठेवले. त्यानंतर या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली. तसेच जिल्हाधिकार्‍यांनाही निवेदन दिले. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरुन सूत्रे हलू लागली. अखेर आज संबंधित महिलेचा जबाब घेऊन आनंदनगर पोलिस ठाण्यात जगतापसह त्याचा साथीदार सुभाष वीर यांच्या विरोधात विनयभंग, धमकी देणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. 

जगताप याच्या कार्यशैलीविरोधात जिल्हा परिषद सदस्यांतही नाराजी होती. गेल्या आठवड्यात जगतापच्या कार्यशैली विरोधात विशेष सर्वसाधारणसभाही बोलावली; मात्र काँग्रेसने ऐनवेळी सत्ताधारी राष्ट्रवादीशी सलगी केल्याने शिवसेना एकाकही पडली व सभाही कोरमअभावी तहकूब झाली. त्यानंतर जगताप याचे हे प्रकरण बाहेर आल्याने सर्वच राजकीय पक्षही हादरले आहेत. आता सर्वच पक्षांनी अश्‍लिल मेसेज प्रकरणानंतर त्याच्यापासून चार हात दूर राहण्याचे प्रयत्न चालवले आहेत. जिल्हा परिषदेतही या प्रकारामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान, जगताप याच्यासाठी पिडीत महिलेला धमकावत असल्याने कार्यालयीन सहकारी वीर याच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
 

Tags : marathwada, marathwada news, crime,education officer of osmanabad jilha parishad ,vulgar messages