होमपेज › Marathwada › बीडचे गोरक्षक सय्यद शब्बीर यांना पद्मश्री

बीडचे गोरक्षक सय्यद शब्बीर यांना पद्मश्री

Published On: Jan 26 2019 10:14AM | Last Updated: Jan 26 2019 10:15AM
बीड : प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील शिरूर येथील रहिवासी असलेल्या आणि असंख्य अडचणींचा सामना करून गोरक्षणाचे काम करणाऱ्या सय्यद शब्बीर यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. निस्वार्थपणे गोपालन आणि गाईंची सेवा करणाऱ्या सय्यद शब्बीर यांना जाहीर झालेला हा पुरस्कार बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. 

शिरूरपासून अवघ्या तीन चार किलोमीटर अंतरावर शेतातील वस्तीवर राहणारे सय्यद शब्बीर नावाची मुस्लिम व्यक्ती गोशाळा चालवते. कसलेही अनुदान नाही, फार मोठी कोणाची मदत नाही तरी देखील सय्यद शब्बीर हे गेल्या वीस वर्षांपासून शेकडो गाईंचे पालन पोषण आणि सेवा करतात. ६५ वर्षीय शब्बीर यांची गोपालन ही वडिलोपार्जित परंपरा आहे. त्यांच्याकडे ८६ गाई असून कुटुंबातील १० व्यक्ती सेवेत कार्यरत आहेत.

विशेष म्हणजे संपूर्ण कुटुंबाने या कामात वाहून घेतलेले आहे. अशा या निस्वार्थाने गो सेवा करणाऱ्या सय्यद शब्बीर यांना पद्मश्री हा देशपातळीवरील भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार घोषित झाला आहे.