Sun, Jul 05, 2020 11:49होमपेज › Marathwada › जालना : कोरोनामुळे ईदगाह परिसरात सन्नाटा

जालना : कोरोनामुळे ईदगाह परिसरात सन्नाटा

Last Updated: May 25 2020 1:04PM
आन्वा : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थेळे आणि प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळी इफ्तार पार्टीही झाली नाही आणि ईदगाहवर ईदची सामुहिक नमाज देखील पडण्यात आली नाही.  कोरोना संकटामुळे यंदाची रमजान ईद घरातच साधेपणाने साजरी करण्यात आली आहे. त्यामुळे आन्वा परिसरातील ईदगाहवर कोणीच ईदची नमाज अदा करण्यासाठी गेले नाही. त्यामुळे ईदगाह परिसरात शुकशुकाट होता. 

राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. या लॉकडाऊन काळात बाहेर गर्दी करणे योग्य नाही. शहरासह ग्रामीण भागातील मशिदी बंद आहेत, तेथे दैनंदिन नमाज पठण बंद आहे. इफ्तार पार्टी देखील होत नाही, त्यामुळे यावेळी ईदच्या खरेदीसाठी घराबाहेर पडू नका. ईद साधेपणाने आपापल्या घरात साजरी करा, पुढचा काळ कसा आहे हे माहिती नाही, त्यामुळे आपल्याकडे जे पैसे आहेत ते जपून वापरा. स्वतःही सुरक्षित राहा आणि दुसऱ्यांनाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन मुस्लिम बांधवांकडून करण्यात आले होते. त्यामुळे सर्वञ साध्या पद्धतीने साजरा केली आहे. 

रमजान ईद ही मिठी ईद म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी मुस्लिम बांधव आपापल्या घरी मिष्टान्न तयार करतात. विशेष म्हणजे रमजान ईद दिनी शीर खुरमा करून खाण्याची पद्धत असून ईदगाहवर जाऊन ईदची नमाज अदा करत, रमजान ईद दिनी गळाभेटीला विशेष महत्त्व असते. मात्र, करोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधव सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आपापल्या घरीच रमजान ईदची नमाज साजरी करण्यात आली आहे.