Mon, Jul 13, 2020 11:43होमपेज › Marathwada › राजीव सातव लढणार नसल्याची चर्चा

राजीव सातव लढणार नसल्याची चर्चा

Published On: Mar 16 2019 1:56AM | Last Updated: Mar 16 2019 1:12AM
हिंगोली ः प्रतिनिधी

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अ‍ॅड. राजीव सातव हे गुजरात राज्यात पक्ष बळकटीकरणासाठी व्यग्र असल्याच्या कारणावरून ते निवडणूक लढविणार नसल्याच्या चर्चेला मागील दोन दिवसांपासून ऊत आला आहे.

खा. सातव यांच्या जागेवर काँग्रेस आघाडीकडून नेमका उमेदवार कोण, यावरही चर्चा होत असल्याने सध्या आघाडीत चलबिचल दिसून येत आहे. 

मागील तीन वर्षांपासून सातव यांनी पूर्णवेळ गुजरात राज्यात पक्ष बांधणीला दिल्याने काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत भाजपला कडवी झुंज देता आली. दुसरीकडे खा. सातव यांनी मात्र, आपल्या निवडणुकीसंदर्भात अजून कुठलाच निर्णय झाला नाही.