Sun, Jun 07, 2020 08:44होमपेज › Marathwada › अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी, पक्षविरोधी कामे केल्याबद्दल कारवाई 

अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Published On: Apr 20 2019 3:13PM | Last Updated: Apr 20 2019 3:58PM
जालना : पुढारी ऑनलाईन

पक्षविरोधी काम करत असल्याचा ठपका ठेवत अखेर काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत केली आहे.

भोकरदन येथे विलास औताडे यांच्या प्रचारासाठी आलेले अशोक चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला. सत्तारांना मी पक्षातून काढत असून आता विषय संपला, असे चव्हाण यांनी सांगितले. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माघार घेऊन काँग्रेस विरुद्ध प्रचार करणार असल्याची घोषणा नुकतीच आमदार अब्दुल सत्तार यांनी केली होती.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सत्तार यांनी पक्षाचे उमेदवार सुभाष झांबड यांच्याविरुद्ध बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली होती. अर्ज भरल्यानंतर त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. मात्र आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.