Sat, Jun 06, 2020 15:42होमपेज › Marathwada › ‘जुमलोवाली’ मोदी सरकार बदला : अशोक चव्हाण 

‘जुमलोवाली’ मोदी सरकार बदला : अशोक चव्हाण 

Published On: Feb 20 2019 8:52PM | Last Updated: Feb 21 2019 1:32AM
नांदेड : प्रतिनिधी

या सरकारने मागच्या साडेचार वर्षाच्या काळात मोठ-मोठी आश्वासने देऊन जनतेला भुलविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता ‘बहुत हुआ जुमलो की मार आब बदलो मोदी सरकार’ असे जनताच म्हणत आहे. सरकार विरोधी वारे वाहायला सुरुवात झाली आहे. असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. ते नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआघाडीच्या प्रचार सभेत बोलत होते.

चव्हाण म्हणाले की, आगामी काळात देशात सत्ताबदल व्हावा, यासाठी ही सभा बदलाची नांदी ठरणार आहे. या सरकारने जनतेला मोठ मोठी स्वप्न दाखवली. परंतु दिलेली कुठलेही आश्वासन पाळले नाही. हे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास सामान्यांचे भवितव्य अधांतरी राहणार आहे. या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घोषणाबाजी सुरू केली आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे. ना धड कर्जमाफी झाली ना २ कोटी रोजगार मिळाले. त्यामुळे जनतेची सहनशीलता संपू लागली आहे. साडे चार वर्षे शिवसेना भाजपवर तोंड सुख घेत होती. आता पुन्हा गळ्यात गळा घालून एकत्र निवडणुका लढणार आहेत. हे सरकार उलथून टाकण्याची वेळ आली आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.