Sat, Jul 04, 2020 17:09होमपेज › Marathwada › हिंगोली : जवळच्या नातेवाईकाकडूनच मतिमंद महिलेवर अत्याचार

हिंगोली : जवळच्या नातेवाईकाकडूनच मतिमंद महिलेवर अत्याचार

Last Updated: May 30 2020 8:27AM

संग्रहित छायाचित्रहिंगोली : पुढारी वृत्तसेवा 

सेनगाव येथील एका ३५ वर्षीय मतिमंद महिलेवर तिच्या जवळच्या नातेवाईकानेच अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेत पीडित महिला गरोदर राहिल्याने प्रकरणाचे बिंग फुटले असून पीडितेच्या नातेवाईक मंडळीनी पीडित महिलेला २८ मे रोजी सेनगाव पोलिस ठाण्यात हजर करून गुन्हा दाखल केला आहे.

खासदार नवनीत राणांकडून पतीचे केशकर्तन (video)

सेनगाव येथील ३५ वर्षीय मतिमंद महिला आपल्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये राहात असल्याने आरोपी रमेश अर्जुनराव लांडे (रा. सेनगाव) याने मतिमंद व असहाय्यपणाचा फायदा घेत या महिलेवर अनेक दिवसांपासून सतत अत्याचार करत होता. या कुकर्मातून पीडितेला गर्भधारणा झाल्याने हा गैरप्रकार उघड झाला. तर ही बाब कोणाला सांगितली तर जीवे मारू कशी धमकी त्याने पीडितेला दिली होती. अत्याचार करणे, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी विरोधात पीडितेची नातेवाईक कांताबाई कुंडलिक गाढवे यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी लांडे विरोधात सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.        

उमरखेड तालुक्यात आढळला दुसरा पॉझिटिव्ह रूग्ण

पीडित महिला आणि आरोपी एकमेकांचे पाहुणे आहेत. आपल्या नातेसंबंधांचा गैर फायदा घेवून आरोपीने पीडित महिलेवर सतत बलात्कार केला. आरोपीला सेनगाव येथील न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाबुराव जाधव हे तपास करत आहेत.