Sat, Jun 06, 2020 22:19होमपेज › Marathwada › भ्रष्टाचार करणाऱ्या छावणी चालकांना प्रशासनाचा दणका

भ्रष्टाचार करणाऱ्या छावणी चालकांना प्रशासनाचा दणका

Published On: Jun 15 2019 11:15AM | Last Updated: Jun 15 2019 11:37AM

file photoशिरूर :  प्रतिनिधी

शिरूर कासार तालुक्यात पशुधनाच्या चारा छावण्यांमध्ये दिवसें-दिवस भ्रष्टाचार उघडकीस येत आहे. तालुक्यात तीन छावणी चालकांवर तहसीलदारांनी तीन लाख बत्तिस हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. 

शासनाने भयानक  दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेऊन तालुक्यात दुष्काळ परिस्थितीमध्ये पशुधनाची चारा पाण्याची सोय करण्यात यावी यासाठी तालुक्यात ५४ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती. तालुक्यात सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना या छावण्यांचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांना छावण्या चालवण्यासाठी दोन-चार कार्यकर्त्यांमधे छावण्या चालवण्यासाठी डील झाले होते. पण यामधून पशुधनाच्या चारापाणी पशुखाद्याची सोय करण्यापेक्षा त्यामध्ये भ्रष्टाचार करून पैसा कमवण्यासाठी प्रत्येक छावणी चालकामध्ये चढाओढ लागली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच छावण्यांमध्ये पशुधनाला ओला चारा, पशुखाद्य,देण्यात येत नाही. तर माती मिश्रित पाणीपुरवठा करण्यात येत आसल्याने पशुधन ते पाणीसुद्धा पित नाही.

या सर्वच छावण्यांचा तहसीलदारांच्या पथकाने बोगस व भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे तालुक्यातील छावण्या कशा चालतात हे उघड होत आहे.

तालुक्यातील आव्हळवाडी येथील छावणीमध्ये तहसीलदारांच्या पथकाला मोठ्या प्रमाणावर आनागोंदी कारभार पाहण्यास मिळाला. त्यामध्ये शासन नियमानुसार पशुधनासाठी दिवसा आड पशुखाद्य देणे बंधनकारक असताना येथे ते देण्यात येत नाही. तर नियमानुसार पशुखाद्य, चारा खरेदी करण्यात येत नाही. आभिप्राय रजिस्टर गायब करण्यात आले होते. या पाहाणीमध्ये हे उघडकीस आल्याने या छावणी चालकाला तहसीलदारांनी नव्वद हजार एकशे सत्तावीस रू. दंड आकारण्यात आला आहे. 

तसेच वडाचीवाडी येथिल चारा छावणीला कडबा कुट्टी, पशुधनाला एक दिवस चारा वाटप केला नाही.  पशुधनाला बिल्ले, पशुखाद्य नियमित नाही अशा विविध प्रकारच्या त्रुटी पथकाला आढळून आल्या. त्यामुळे या छावणीवर एक लाख बत्तिस हाजार आठशे पंधरा( १३२८१५) रूचा दंड आकारण्यात आला आहे. 

तसेच खोकरमोह येथील चाराछावणीमध्ये  ५२ पशुधन कमी आढळून आले. बिल्ले, धनादेश, विविध प्रकारच्या चारा छावणी मधे आनागोंदा कारभार पथकाच्या निदर्शनास आल्याने तहसीलदार यांनी या छावणी चालकाला १०८२१६ दंड आकारण्यात आला आहे. आश्या प्रकारे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या आनागोंदी कारभार पथकाच्या निदर्शनास येत आल्याने तहसीलदार किशोर सानप यांनी या मधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपल्या पथका मार्फत तपासणी मोहीम हाती घेतली आहे.