Thu, Jun 04, 2020 23:49होमपेज › Marathwada › सिंदखेड राजाचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे, तर लोणारवर काँग्रेसचा झेंडा

सिंदखेड राजाचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे, तर लोणारवर काँग्रेसचा झेंडा

Published On: Mar 25 2019 6:12PM | Last Updated: Mar 25 2019 6:12PM
बुलडाणा : पुढारी ऑनलाईन 

बुलडाण्यातील  सिंदखेड  आणि लोणार या दोन नगरपरिषदांचे निकाल लागले आहेत. सिंदखेड नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच पहाला मिळाली. तर  लोणारमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. 

बुलडाण्यातील सिंदखेड राजा आणि लोणार नगरपरिषदांमध्ये प्रत्येकी १७ जागांचे निकाल लागले आहेत. सिंदखेड राजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस१७ पैकी ८ जागा जिंकून सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. पण, शिवसेनेने त्यांना कडवी टक्कर देत ७ जागा मिळवल्या तर भाजपला १ आणि १ जागा अपक्षाला मिळाली आहे. तसेच नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आले आहे.  लोणारमधील १७ जागांपैकी १० जागा जिंकल्याने काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवण्यात यश मिळाले आहे. तर शिवसेनेला ७ जगांवर समाधान मानावे लागले आहे. नगराध्यक्षपदीही काँग्रेसचाच उमेदावार जिंकला आहे. 

महाराष्ट्रातील तीन नगरपरिषदांमधील शिवसेनेने पालघर आणि सिंदखेड राजा नगरपरिषदांमध्ये चांगली कामगिरी केली. आहे. पण, शिवसेनेला पालघरमधील नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यात अपयश आले. तीच गत राष्ट्रवादीची सिंदखेड राजा नगरपरिषदेत झाली. त्यांना १७ पैकी सर्वाधिक ८ जागा जिंकूनही त्यांना नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकता आली नाही. तर काँग्रेसने लोणार नगरपरिषद निवडणूक एक हाती जिंकली. तसेच नगराध्यक्षपदही आपल्याकडे राखले.