Thu, Jun 04, 2020 22:52होमपेज › Marathwada › भाटअंतरवलीत सरपंचासह सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाटअंतरवलीत सरपंचासह सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 1:18AMगेवराई : प्रतिनिधी

तालुक्यातील भाटअंतरवली ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य अपक्ष म्हणून निवडून आले होते. या ग्रामपंचायतीवर काही नेत्यांनी आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. आजवर केवळ आश्‍वासनांची खैरात करणारांच्या कारभाराला कंटाळून सरपंच बबनराव गुंजाळ, उपसरपंच शेख अकबर व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. गावातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात विजयसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत केले.

गेवराई तालुक्यात विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वारे जोरात वाहू लागले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. तालुक्यातील भाटआंतरवली ग्रामपंचायतीच्या अल्पसंख्याक आणि दलित वस्ती योजनेतील विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त आयोजित समारंभात सरपंच बबनराव गुंजाळ, उपसरपंच शेख अकबर, ग्रामपंचायत सदस्य अर्षद शेख, धर्मराज धोत्रे, शेख वाहेद हबीब, माजेद शेख, मोहन कापसे यांच्यासह नयीम पठाण, शेख नाजेम, शेख नजीर, अशोक धोत्रे, सय्यद रहेमतूल्ला, शेख सोजर, शेख सरताज, शेख अकबर, शेख राजू, शेख जावेद, शेख वहाब, शेख जिलानी, शेख मुसाभाई, शेख सलीम, शेख अर्षद, शेख सुलतान, शेख इरफान, दिलीप मोरे, लखन कापसे, बाळू कापसे, शेख हनीफ आदी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.

कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे, शहराध्यक्ष गुफरान इनामदार, संदीप मडके,  वसिम फारोकी, राजू शेख, बाळासाहेब पानखडे, रमेश पवार, तीर्थराज गवारे, राजाभाऊ गवारे, अंबादास राठोड, मुरलीधर गरूड, पोपट चव्हाण, कल्याण पठाडे, दिलीप बापू पानखडे, दिगंबर आडे,  शेख मुबारक, बद्रीनाथ दिवान, अमोल देशमुख आदी उपस्थित होते.

स माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित म्हणाले की भाटअंतरवली ग्रामपंचायतीवर अधिकार सांगणार्‍याकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची सत्ता असतानाही केवळ नाकर्तेपणामुळे या ग्रामपंचायतीला कोणताही निधी मंजूर करता आला नाही. भाटअंतरवली ग्रामस्थ मागील अनेक वर्षांपासून शिवाजीराव पंडित कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ही ग्रामपंचायत 45 वर्षांनंतर पहिल्यांदाच इतर पक्षाच्या ताब्यात गेली होती, मात्र पुन्हा सहा महिन्यांच्या आत या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.