Fri, May 29, 2020 03:24होमपेज › Marathwada › बीड : संप काळात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना भरल्या बांगड्या

बीड : संप काळात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना भरल्या बांगड्या

Published On: Aug 07 2018 2:24PM | Last Updated: Aug 07 2018 2:24PMबीड : प्रतिनिधी

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. संपाच्या पहिल्या दिवशीच बीड येथील रजिस्ट्री, जलसंपदा, लाभक्षेत्र विकास कार्यालयातील काही कर्मचारी काम करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे संघटनेच्या महिला पदाधिकार्‍यांनी त्या कार्यालयात जाऊन काम करणार्‍या कर्मचार्‍यांना बांगड्या भरल्या. 

राज्यासह जिल्ह्यातील कर्मचारी मंगळवार ते गुरूवारपर्यंत तीन दिवसीय संपावर गेल आहेत. हा संप अतिशय व्यापक पद्धतीने करण्याचा निर्धार कर्मचार्‍यांनी केला आहे. आंदोलनाचा पहिल्या दिवशी बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील, महसूल संबंधितील सर्व विभाग ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान, संघटनेच्या सदस्यांना बीड शहरातील रजिस्ट्री कार्यालयातसह इतर कार्यालयात कर्मचारी काम करत असल्याचे समजले. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन संप काळात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना संघटनेच्या महिला पदाधिकार्‍यांनी बांगड्या भरल्या.