Mon, Jun 01, 2020 18:56
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › 'मराठवाड्याच्या दुष्काळाला ऊसच कारणीभूत, बंदीची शिफारस'

'मराठवाड्याच्या दुष्काळाला ऊसच कारणीभूत, बंदीची शिफारस'

Published On: Aug 28 2019 8:03PM | Last Updated: Aug 30 2019 1:41AM

संग्रहित छायाचित्रमराठवाडा : पुढारी ऑनलाईन

मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी ऊस पिकाच्या लागवडीवर बंदी घालावी असा अहवाल औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. मराठवाड्यातील साखर कारखानदारीचा अभ्यास करून हा अहवाल सादर केला आहे. ऊसाची लागवड बंद करून या पाण्याचा वापर मोठे क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते असे अहवालात नमुद करण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ ६० टक्क्यांनी कमी होईल असा दावा विभागिय आयुक्त केंद्रेकर यांनी केला आहे.

मराठवाड्यात सद्या सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड होते. यासाठी प्रती हेक्टर दोन लाख लीटर पाण्याचा वापर केला जातो. हा आकडा २१७ टीएमसी आहे. जायकवाडीसारखी दोन धरणे भरतील एवढा मोठा हा वापर आहे. ऊस लागवड आणि त्यासाठी लागणारे पाणी याचा अभ्यास केल्यास दुष्काळाचे मुख्य कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आयुक्तांनी ऊसाची लागवड बंद करण्याची शिफारस केली आहे. या जागी डाळी किंवा तेलबियांचं पीक घेण्यात आले तर २२ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

मराठवाड्यात सुमारे ५० च्या वर सहकारी आणि खासगी सहकारी कारखाने आहेत. २०१० च्या आधी ही संख्या ४६ होती. दरम्यान, मराठवाड्यात पावसाचे प्रमाण  घटत असुन ऊस लागवडीचे प्रमाण वाढत आहे. मराठवाड्यात एकूण २४ टक्के ऊस लागवडी योग्य क्षेत्र असली तरी प्रत्यक्ष लागवड २७ टक्के झाली आहे. साखरेच्या उत्पादनातही ४७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.