Sun, Jul 05, 2020 12:51होमपेज › Marathwada › अशोक चव्हाण उपचारासाठी मुंबईस रवाना

अशोक चव्हाण उपचारासाठी मुंबईस रवाना

Last Updated: May 25 2020 2:02PM
नांदेड : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब रविवार दि.24 रोजी रात्री प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झाली. या वृत्तामुळे नांदेडसह राज्यभरात खळबळ उडाली. त्यांना उपचारासाठी शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यांना आज (ता.२५) पुढील उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. सकाळी अ‍ॅम्ब्युलन्सने ते मुंबईकडे रवाना झाले. यावेळी आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहन हंबर्डे यांच्यासह निकटवर्तीय उपस्थित होते.

अधिक वाचा : जालना : कोरोनामुळे ईदगाह परिसरात सन्नाटा

विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री अशोक चव्हाण मुंबईस गेले होते. त्यावेळी तेथील त्यांच्या वाहनचालकास कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांनी दोनवेळा कोरोनाची तपासणी करून घेतली. पुन्हा एकदा तपासणी करून घ्यावी असा सल्ला त्यांना मुंबईतील डॉक्टरांनी त्यांना दिला होता. मुंबईतील कामकाज आटोपून ते मागील आठवड्यात नांदेडला आले. तेव्हापासून ते घरीच होते. या काळात त्यांनी लोकांना भेटणे टाळले होते.

अधिक वाचा : सीएम योगींच्या 'या' अजब फतव्याने राज्यातील उद्योगांची अडचण होणार?

रविवारी सकाळी त्यांनी शासकीय रूग्णालयात जाऊन तपासणी करून घेतली होती. रात्री तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंत नांदेडमध्ये एका खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर मंत्री चव्हाण यांना पुढील उपचारांसाठी येथून सुसज्ज रूग्णवाहिकेतून मुंबईला हलविण्यात आले. त्यांच्यासमवेत डॉ.अंकुश देवसरकर यांच्या नेतृत्वाखाली एक वैद्यकीय पथक असून इतर काही कर्मचारी दुसर्‍या वाहनांतून मुंबईकडे रवाना झाले.

अधिक वाचा : सीएम योगींच्या 'त्या' निर्णयानंतर राज ठाकरेंकडूनही रोखठोक पलटवार!

गेले दोन महिने आपल्या जिल्हावासियांची काळजी घेत असताना स्वतः चव्हाणच करोनाबाधित झाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय, आप्‍त, राजकीय सहकारी आणि समर्थक चिंताग्रस्त झाल्याचे दिसले. त्यांच्या कुटुंबातील सदस्य व घरगुती कर्मचार्‍यांचा करोना चाचणी अहवाल नकारात्मक आल्याचे सांगण्यात आले.