Sat, Jun 06, 2020 15:31होमपेज › Marathwada › ‘टपरी’वरची कॉफी एकदम बेस्ट : अजित पवार(व्हिडिओ)

‘टपरी’वरची कॉफी एकदम बेस्ट : अजित पवार(व्हिडिओ)

Published On: Jan 22 2018 1:04PM | Last Updated: Jan 22 2018 1:04PMहिंगोली : प्रतिनिधी

हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने मराठवाडा दौऱ्यावर असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हिंगोलीजवळील कळमनुरी गावाजवळ रस्ताच्याकडेला असलेल्या चहाच्या टपरीवर भजी, खिचडी आणि कॉफिचा आस्‍वाद घेतला. यावेळी अजित पवार यांनी ‘टपरी’वरची कॉफी एकदम बेस्‍ट म्‍हणत टपरी चालकाला भजी, खिचडी आणि कॉफिचे बिलही दिले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा आज सातवा दिवस आहे. काल माहूर येथील सभा झाल्यानंतर आज हिंगोली येथील सभेला हल्लाबोल यात्रा मार्गक्रमण करत होती. प्रवास करत असताना अजित पवारांना कॉफिची तल्लफ झाली आणि त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. रस्त्यावर कोठेच चांगले हॉटेल नव्हते म्हणून चालक गाडी थांबवण्यासाठी थोडे शाशंक होते. मात्र, अजित पवारांनी कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा येथे एका टपरीवर गाडी थांबवून तेथे कॉफि पिणे पसंद केले.

कॉफि बनवेपर्यंत अजितदादांनी चहावाल्याशी संवाद साधायला सुरुवात केली. टपरीवर आणखी काय स्पेशल मिळते असे विचारल्यावर येथे भजी आणि खिचडी फेमस असल्याचे चहावाल्याने सांगितले. तेव्हा गरम गरम भज्यांचाही त्‍यांनी आस्वाद घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सतीश चव्हाण, विक्रम काळे आणि चित्रा वाघ उपस्थित होत्‍या.