Sun, May 31, 2020 03:21होमपेज › Marathwada › हायवाने दुचाकीला चिरडले

हायवाने दुचाकीला चिरडले

Published On: Apr 16 2019 2:18AM | Last Updated: Apr 16 2019 2:18AM
कन्नड : प्रतिनिधी 

तालुक्यातील रेलतांड्याजवळ दगडाने भरलेल्या हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तीन जण ठार झाले. मृतांत बापलेकीचा समावेश आहे. ही घटना रविवारी रात्री 7.45 वाजेच्या 
सुमारास घडली. 

संदीप बाळू गायकवाड (30), अनुसया (4, रा. बाभूळखेडा, ता. वैजापूर), प्रमोद  अशोकराव गायकवाड (28, रा अंधानेर) अशी मृतांची नावे आहेत. यातील संदीप व अनुसया बापलेकी आहेत. हे तिघे रविवारी दुचाकीने तालुक्यातील औराळा येथे यात्रेला गेले होते. यात्रेहून परत येताना त्यांची दुचाकी औरंगाबाद-चाळीसगाव  ार्गावरील रेलतांड्याजवळ आली. रात्री या ठिकाणी दगड वाहतूक करणार्‍या हायवा ट्रकने (क्र. एमपी 39- एच. 1772) दुचाकीला जोराची धड दिली. यात प्रमोद हे जागीच ठार झाले. संदीप व त्यांची मुलगी अनुसया गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दोघांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संदीप हे सहा महिन्यांपूर्वीच अंधानेर येथे  ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होते. प्रमोद यांच्यावर अंधानेर, तर संदीप व अनुसया यांच्यावर बाभूळखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी ट्रकचालक प्रदीपकुमार वैश्‍व (रा. मध्य प्रदेश) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक व्ही. एम. आहेर करत आहेत.