Thu, Oct 17, 2019 14:10



होमपेज › Marathwada › मराठवाडा : आंध्र प्रदेशात जीपला अपघात, मुखेड-वसूर तांडातील ५ ठार

आंध्र प्रदेश :अपघातात मराठवाड्यातील ५ जण ठार

Published On: Sep 06 2018 2:13PM | Last Updated: Sep 06 2018 2:14PM



मराठवाडा : प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील वसूर तांडा येथील लक्ष्मण गणपती चव्हाण कुटुंबीय तिरुपती दर्शनासाठी गेले होते. काल दिनांक ५ रोजी ते निघाले असता आंध्र प्रदेशमधील कर्नूल ते कडप्पा या मार्गावर क्रुझर जीप उलटली. त्‍यात चालकासह पाच जणांचा मृत्यू झाला. तर १७ जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींमध्ये लहान बालकांचा समावेश आहे.