Thu, Oct 17, 2019 13:22होमपेज › Marathwada › गणपती मिरवणुकीत तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मिरवणुकीत एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Published On: Sep 03 2019 2:41PM | Last Updated: Sep 03 2019 1:57PM

श्याम महादेव गोंडेअंबाजोगाई : प्रतिनिधी 

गणपतीच्या मिरवणूकीत नाचताना ३६ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ (पटाईत गल्ली) येथे सोमवारी रात्री  साडे आठच्या दरम्यान घडली. श्याम महादेव गोंडे असे त्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोमवारी गणेश चतुर्थी निमित्ताने सर्वत्र गणेशाची स्थापना करण्यासाठी तरुणांची लगबग सुरू होती. रविवार पेठेतील (पटाईत गल्ली) युवकांनी गणेश स्थापना करण्यासाठी गणपतीच्या मूर्तीची खरेदी करून वाजत-गाजत मिरवणूक काढली. ती मिरवणूक रविवार पेठ गल्लीत आली असता शाम महादेव गोंडे हे मिरवणुकीत सामील झाले. यानंतर ते जल्लोष करत असतानाच गोंडे यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. 

यानंतर उपस्थित तरुणांनी श्याम गोंडे यांना तात्काळ उपचारासाठी स्वामी रामानंदतीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.