Thu, Oct 17, 2019 13:06होमपेज › Marathwada › बीड : वीज कोसळून युवकाचा मृत्यू

बीड : वीज कोसळून युवकाचा मृत्यू

Published On: Apr 04 2019 7:25PM | Last Updated: Apr 04 2019 7:25PM
धारूर (जि. बीड) : प्रतिनिधी 

तालुक्यातील धुनकवाडमध्ये वीज कोसळून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. संदीप श्रीकृष्ण काळे (वय २०) असे मृत्‍यू झालेल्‍या तरूणाचे नाव आहे.

संदीप काळे हा ढगाळ वातावरण निर्मान झाल्याने गावापासून एक किलोमिटर अंतरावर असलेल्या शेतात कापणी करून टाकलेल्या ज्वारीचा कडबा गोळा करण्यासाठी गेला होता. कडबा गोळा करीत असताना त्‍याच्या अंगावर वीज पडल्याने  भाजून त्याचा जागीच मृत्यू झाला. 

हलक्या सरी
धारूर तालुक्यात गुरुवारी दुपारी अचानक आकाशात ढग जमून पावसाचे वातावर निर्मान झाले होते. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शहरासह परिसरात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या.